भंते ज्ञानज्योतीजींची ऐतिहासिक बुद्धभूमी स्थळाला भेट.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
*⭕रामदेगी, चिमूर येथील भंते ज्ञानज्योती हे गडचांद येथे दिनांक २२ ऑक्टोबर ला गडचांदूर येथील वर्षावास कार्यक्रमाला आले असता गडचांदूर येथील ऐतिहासिक बुद्धभूमी स्थळाला आपल्या संघासह सदिच्छा भेट दिली.*

*यावेळी बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे आणि ‘विदर्भाचा वीर’चे संस्थापक संपादक प्रभाकर खाडे यांनी आद. भंते ज्ञानज्योती यांची भेट घेऊन येणाऱ्या जनगणनेत बौद्ध म्हणून नोंद करण्यासंदर्भात चर्चा केली. येणाऱ्या जनगणनेत काही कार्यकर्ते बौद्ध धम्मात जाती नसल्याने केवळ बौद्ध म्हणून आणि काही काही कार्यकर्ते बौद्ध धर्म व संबंधित जाती नोंद करावी; या मताचे असल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काय नोंद करावी, अशी चर्चा भंतेजी सोबत केली असता या संदर्भात आद. भंते ज्ञानज्योतीजीने म्हणाले की, काही कार्यकर्ते हेतू पुरस्सर संभ्रमाची परिस्थिती निर्माण करून बौद्धाची लोकसंख्या कमी करीत आहेत. बाबासाहेबांनी आपणाला जाती सोडावयास सांगितलेल्या जाती काही लोक लिहायला, कवटाळायला सांगत आहेत, ही बाबासाहेबांच्या विचारांची फसवणूक आहे. असे सांगणारे, प्रचार करणारे बाबासाहेबांचे विरोधक आहेत. बाबासाहेबांनी आपणाला जाती विरहित बौद्ध धम्म दिलेला आहे. आपण कोणाचेही न ऐकता केवळ बाबासाहेबांचे ऐकायचे आहे आणि बाबासाहेबांच्या आदेशांचे पालन करावे. ज्यांना बाबासाहेबांचे ऐकायचे आहे अशा बौद्ध बांधवांनी येणाऱ्या जनगणनेत धर्म आणि जातीच्या रकान्यात प्रखरतेने बौद्ध म्हणूनच नोंद करण्यात यावे. असे भंते ज्ञानज्योतीजी यांनी आग्रहाने प्रतिपादन केले.*

*सदर चर्चे दरम्यान सामाजिक व धार्मिक स्थितीबाबत सुद्धा भंतेजी सोबत दिलखुलासपणे चर्चा झाली. त्याचप्रमाणे ३१ ऑक्टोबर ला चिमूर येथे भंते ज्ञानज्योतीजी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक सर्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत, त्यात आवर्जून उपस्थितीत राहण्यास सांगितले.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *