मोफत उपचाराच्या योजना भरमसाठ, तरीही सुने याचकाचे हात…!!

by : Shankar Tadas
गडचांदूर :
सोशल मीडिया कित्येक बाबतीत वरदान ठरत असतो. गडचांदूर येथील एका गरजू महिलेच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे संदेश या माध्यमातून प्राप्त झाला. असे अनेक मॅसेज आपण पाहत असतो. देशात एकापेक्षा एक योजना मोफत उपचारासाठी असताना या योजनामधून हेच गरजू का सुटावेत असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. गरजूपर्यंत आमच्या योजना पोहोचण्याची काहीतरी यंत्रणा आपल्याकडे असेल तर ती अगदीच कमकुवत असल्याची जाणीव या मदतीच्या मॅसेजमुळे प्रकर्षाने होते.
प्राप्त मॅसेज जसाच्या तसा येथे देतोय…गरजूपर्यंत आवश्यक मदत पोहचलीच पाहिजे, हा हेतू :
”आयु संध्या लोमेश बारसागडे मु पो गडचांदुर ता.कोरपना जि.चंद्रपूर (म.रा) हे गडचांदुर गावात 30 वर्षा पासून शेखर गजानन बांगडे, जोतिबा फुले चौक वार्ड नं 3 यांच्या घरी किरायाने राहत आहे आणि मोलमजुरी करून जीवन जगत आहे. संध्या लोमेश बारसागडे यांचे वय 42 वर्ष आहे आणि त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा वयाने लहान आहे आणि ते शिक्षण घेत आहे. त्यांना नागपूर येथे (एम्स) मध्ये दाखविण्यात आले. डॉक्टर नी सांगितले की हा ब्रेस्ट कॅन्सर    आहे आणि तो शरीरभर   पसरलेला आहे. तुम्ही इथुन घेऊन जा इथे यांचा इलाज  होत नाही. आम्ही औरंगाबादला कॅन्सर हॉस्पीटल मध्ये त्यांना घेऊन गेले तिथे त्यांची टीटमेंट चालू आहे . परंतु येनारा खर्च या गरीब कुटुंबीयांना दवाखान्याचा खर्च झेपावत नसल्यामुळे त्यांना आथिर्क मदतीची गरज आहे. तरी कृपा करून या गरीब कुटुंबीयांना येता शक्ती मदत द्याल अशी आपणास विनंती करतो.

मदतीसाठी संपर्क :-  phone pay no. 7841893489

#Helpforcancerpetient #Gadchandur

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *