कोरोना काळातील कोविड योध्याचे कार्य अतुलनीय,,,,,प्राचार्या स्मिता चिताडे।।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕,,,,,,,,,,,,,,,,,
,,महात्मा गांधी विद्यालयात महिला कोविड योद्धांचा केला सत्कार,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
गेल्या 2 वर्षांपासून कोरोना ने संपूर्ण जगाला हतबल करून टाकले असून अनेकांना प्राण गमवावे लागले अशा भयावह कोरोना काळात कोविड योध्याचे कार्य अतुलनीय असून स्वतः चा जीव धोक्यात घालून नागरिकांना जीवदान दिले अशा कोविड योध्याचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे असे मत प्राचार्या सौ स्मिता चिताडे यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयात 10 जानेवारी ला आयोजित*सावित्री ते जिजाऊ सन्मान …..महाराष्ट्राच्या लेकीचा* अभियाना अंतर्गत ‘कोविड योद्धयांचा सत्कार’ करण्यात आला त्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव श्री.धनंजय गोरे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार , उपमुख्याध्यापक अनिल काकडे , पर्यवेक्षक एच, बी,मस्की ,सौ. शोभा जिवतोडे उपस्थित होत्या.
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे 3 जानेवारी पासून सावित्री ते जिजाऊ सन्मान,, महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबविण्यात येत आहेत, या अंतर्गत विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहेत, त्या अंतर्गत 10 जानेवारी ला सभागृहात कोरोना काळात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला कोविड योध्याचा सत्कार शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, कोविड योध्या पोलीस उप निरीक्षक निशा खोब्रागडे, शिपाई सुषमा आडकीने,आरोग्य अधिकारी डॉ ,दीक्षा ताकसांडे ,हर्षा भगत,प्रतिभा काळे,आशा वर्कर कल्पना इटनकर, कविता पथाडे, योगिता वांढरे,छायाताई पिदूरकर,नगर परिषदेच्या सफाई कामगार संगीता शेट्टी, प्रांजली शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला, सत्कारमूर्ती नी आपल्याला मनोगतात कोविड काळातील अंगावर शहारे आणणारे स्वानुभव कथन केले,,कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच, बी, मस्की यांनी केले, सूत्रसंचालन श्री. प्रशांत धाबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संतोष. मुंगुले यांनी केले.या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *