मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर, चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…*                                 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।

——————————————–
दसऱ्याच्या दिवशी लवकर शिमगा आला असं वाटल्यामुळे केंद्राच्या आणि भाजपाच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा उद्धव ठाकरे यांनी केला, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर चंद्रकांच पाटील यांनी प्रतिहल्ला केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरला उमदेवार आयात करावा लागला, असे म्हणत भाजपावर टीका केली होती. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जरा तुमची यादी वाचा अब्दूल सत्तार कुठून आले. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा पळवला आणि त्याला उमेदवारी दिली, निवडणूक लढवली, मुलाचा पराभव पण झाला. त्यानंतर भाजपचा खासदार घेतला आणि जागाही घेतली, अशी मोठी आमच्याकडे आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा संदर्भ घेत भाजपावर निशाणा साधला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही कुठे होता, असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले “हे चिंताजनक आहे. यासाठी इतिहास वाचावा लागतो, स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही कोठे होता. तुमचा जन्म झाला नव्हता. पण स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना कुठं होती?, मात्र १९२५ मध्ये संघाची स्थापणा झाल्यानंतर स्वातंत्र्य लढा तिव्र झाल्यानंतर डॉ हेडगेवारांनी संघ स्थगित ठेवला आणि स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संघाची सुरवात केली. हा इतिहास आपल्याला माहित नाही.”

आणीबाणीमध्ये अनेक पत्रकार, लाखो संघाचे कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते, तुम्ही काय केलं होतं? असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. “आजच्या भाषणात कशाचा कशाला धागा जुळत नव्हता. लष्करी संग्रहालयाबद्दल बोलले, पण दोन वर्षात शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झालं? २७ नोव्हेंबरला तुम्हाला दोन वर्ष पुर्ण होतील. जर तुम्ही कालावधी पुर्ण केला तर? गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही काय केलं. या वर्षात स्मारकाचं काय झाल. भाषणात आज खूप हिंदुत्व आठवायला लागलं. सत्तेत येतांना शिव शब्द पण जवळ करत नव्हता. तुमच्या मनामध्ये हिंदुत्व आहे. पण सत्तेसाठी ते तुम्हाला बाजूला ठेवावं लागत. बाबरी मस्जिद पाडण्याचे श्रेय घेत आहात. एक तरी शिवसैनिक तिथे होते का? रामजन्मभूमी बद्दल संघाने लोकांपर्यंत पोहवचलं, तुम्ही शिवसेनेने काय केलं?”, असा प्रश्न करत चंद्रकांत पाटलांनी शिवसेवर निशाणा साधला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *