शोध ख-या रावणाचा

w…!
लोकदर्शन गडचांदूर 👉
दसरा आला की रावण दहणावरून वाद प्रतिवाद केला जातो आहे.आदिवाशी लोक रावणाला आपला राजा मानतात.राजा रावण मानवतावादी समृध्द व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक असलेला निसर्ग रक्षक,उत्कृष्ट समाजव्यवस्थेचा उद्गाता,समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा होता असे आदिवासी समाजातील लोकांचे म्हणणे आहे. तामिळनाडू राज्यात महात्मा रावणाची ३५२ मंदिरे आहेत.छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड व राज्याच्या मेळघाट तालुक्यात राजा रावणाची पूजा अर्चना केली जात असून आदिवासी लोक आजही रावणाला आपला राजा मानून त्याच्या स्मृतीला अभिवादन केले जात असल्याने रावण दहनाची प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी आदिवासी समाजातून जोर धरते आहे.तसेही रावण हे अहंकाराचे प्रतिक मानले जात असून श्रीरामाने असत्यावर सत्याचा विजय स्थापित केल्याने दसरा हा सण साजरा केला जातो आहे.मानवी मनातील दोष,अहंकाराचा नायनाट करण्यासाठी प्रतिकात्मक रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.
राजा रावण बुद्धीप्रामाण्यवादी होता.वेद, उपनिषदे यांचा प्रगाढ अभ्यासक होता.शिवभक्त उपासक होता .दक्षिणेतील आदिवासी लोकांच्या मनात आजही रावणाचे स्थान अढळ आहे.ते त्याची मनोभावे पूजा अर्चा करतात. रामायणात राजा रावणाने सितेच्या रूपावर भाळून तिचे अपहरण केले असल्याचा उल्लेख आहे.परंतू संपूर्ण रामायणात सितेचा छळ केल्याचा उल्लेख आढळून येत नाही.किंवा सितेच्या जीवाला घात केल्याचा उल्लेख आढळून येत नाही.तिच्या अब्रूवर हात घातल्याचा उल्लेख कुठेही दिसून येत नाही.आज तर अनेक राज्यकर्ते खासदार,आमदार स्वतःला राजा समजूनच समाजात वावरताना आढळून येतात.‌ समाजात आपला वचक कायम रहावा म्हणून त्यांना राजे म्हणून मान्यता न देणा-या लोकांचा छळ करतात.त्यांना या ना त्या कारणाने समाजात प्रताडीत केले जाते आहे.आजही स्त्रि ही आपली दासी आहे असे समजून तिच्यावर बलात्कार केला जातो आहे.तिच्या शिलावर खोटेनाटे आरोप करून तिला प्रताडीत केले जाते आहे.राजकीय आवरणाखाली आपल्या असभ्य वर्तनावर पांघरून घातले जाते आहे.तरीही लोक अश्या लोकांच्या दबावाखाली येऊन समाजात वावरताना आढळून येत असतात.आजचे कोर्ट,कायदे कानून त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही.अश्या अहंकाराने मदमस्त असलेल्या रावणरूपी लोकांचा बंदोबस्त कोण करणार आहेत ? आपल्यातील ख-या रावणाचा शोध न घेता प्रतिकात्मक रावणाच्या पुतळ्याचे दहन करून आपणांस काय साध्य करायचे आहे ? आज संपूर्ण देशात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. दररोज राजरोसपणे स्त्रि ही जाळली जात आहे.स्त्रि च्या देहाची प्रचंड प्रमाणात विटंबना होत आहे.स्त्रि ला समाजात मानाचे स्थान आजही प्राप्त झालेले नाही.स्त्रि ला देवतेची उपमा देऊन,तिची पुजा अर्चा करून स्त्रि चे बळ वाढणार आहे कां ?असे घडून येत नसेल तर हा दोष कुणाचा ? याचा विचार करण्याची वेळ आज समाजावर आलेली आहे.आज ख-या रावणाचा शोध घेण्याची वेळ समाजावर आलेली आहे.
तर मग खरे रावण कोण ? जे देशाची सुरक्षितता धोक्यात आणू पहातात.जे भ्रष्ट्राचार करून जनतेचा पैसा आपल्या तिजोरीत जमा करू पहातात.जे सरकारची तिजोरी लुटून आपल्या संपत्तीत कुठलाही व्यवसाय न करता भर पाडू पहातात.जे सरकारी संपत्तीचे नुकसान करून आपली सत्ता कायम ठेवू पहातात .जे आपल्या राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेचा बळी देवू पहातात.आपल्या राजकीय व वैयक्तिक स्वार्थासाठी स्त्रियांचे मुलभूत अधिकार व हक्क डावलून त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ पहातात.जे शक्ती कायदा तर करू पहातात पण तो आपल्यावर पलटणार नाही याची काळजी घेतात.कायदे गरीब व सामान्य जनतेसाठी लागू असतात ते आपणांस लागू होत नाहीत अशी ज्यांची समज असते ते. कायदे राबविण्या-या यंत्रणेला जे आपल्या खिशात ठेवू पहातात ते.रावणराज हा शब्द प्रयोग तालिबानी राजवटीसाठी लागू होतो.लोकशाहीतील तत्वांची पायमल्ली करून आपले एककल्ली विचार रूजविण्यासाठी जे प्रयत्नरत असतात ते रावणराज या गटात मोडतात.हम करे सो कायदा ही त्यांची मनोवृत्ती असते.यातून ते बाहेर पडू इच्छित नाहीत. मग वाईट गोष्टींचे,प्रवृत्तीचे सिमोलंघन करण्यासाठी
दस-याचे निमित्त कशाला हवे आहे ? तर ते एक प्रतिक आहे.वाईट गोष्टींचे निर्दालन करण्यासाठीचे. याचा वापर राजकारणासाठी होता कामा नये. समाजातील दरी वाढविण्यासाठी होता कामा नये. कुणाची मने दु:खविण्यासाठी होता कामा नये.तर दसरा हा सण ह्रदयरूपी सोन्याची पाने देऊन एकमेकांना आलिंगन देऊन दुभंगलेली मने जोडण्यासाठी करण्यात यावा एवढीच माफक अपेक्षा या सणाकडून आपणांस करता येईल असे वाटते.
******
सामाजिक कार्यकर्ते, लेखक
मिलिंद गड्डमवार, राजुरा
यांची फेसबुक पोस्ट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *