नांदा फाटा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न १६१ नागरिकांचे रक्तदान*

By : Mohan Bharti

नांदाफाटा येथील युवकांचा पुढाकार

गडचांदूर : – राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नांदा, बिबी, आवारपुर काँग्रेस कमिटी व नांदा युवक मित्रांनी नांदाफाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. १६१ नागरिकांनी रक्तदान करून आमदार सुभाष धोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला आमदार सुभाष धोटे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर, वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्तदान शिबीराला भेट दिली. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील १६१ युवकांसह नागरिकांनी रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्वेच्छेने रक्तदान करून आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस साजरा केला. शिबिराला सतीश जमदाडे, महेश राऊत, कल्पतरू कन्नाके, ओंकेश गोंडे, संजय नित, विजय ढवस, कुणाल खेडेकर, प्रितम मेश्राम, डाॅ.स्वप्नेश चांदेकर, अभय मुनोत यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन परिश्रम घेतले. चंद्रपूर रक्तपेढीचे अधिकारी जय पचारे, पंकज पवार, रुपेश घुमे, साहील भसारकर, आशिष काबंळे यांनी अत्यंत व्यवस्थितपणे रक्तसंकलन करून घेतले. कोरपना तालुका आरोग्य विभागाचे डाॅ. चंदनखेडे व त्यांच्या संपूर्ण चमूने रक्तदान शिबिरात मदत कार्य केले. नांदा शहर काँग्रेस कमिटीतर्फे आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *