भटके-विमुक्तांना सेवा पदोन्नतीत आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना मागणी

लोकदर्शन 👉 माहेशजी गिरी


*⭕भटके-विमुक्त हक्क परीषदेचीतर्फ व ओबीसी व्हीजे. एनटी.संघर्ष समन्वयक समिती प्रशासनाला निवेदन*

नागपूर:- व्हीजे एनटी. एसबीसीच्या सेवा पदोन्नती आरक्षणातील अपुरे प्रतीनिधित्वाबद्दल सांख्यिकीत माहिती जोडून सुधारित प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करून भटक्या-विमुक्तांना सेवा पदोन्नतीत आरक्षण मिळावे अशी मागणी भटके-विमुक्त हक्क परिषद नागपूर शाखेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजया बनकर मॅडम यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत गठीत करण्यात आलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे शासकीय समितीतर्फे जे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे त्यातील पान क्रमांक 41व 43 मध्ये भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्गाबाबत पदोन्नतीतील ‘आरक्षण असंविधानिक आहे’ असे नमूद करण्यात आले आहे त्यात समस्त भटके-विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलेला आहे वास्तविक सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित असणाऱ्या मुद्द्यांपैकी मागासवर्गीयांचे अपुरे प्रतिनिधी प्रतिनिधित्व त्यांचे मागासलेपण सिद्ध करणे प्रशासनातील कार्यक्षमता सादर करणे अपेक्षित होते जे उच्च न्यायालयात सादर केले नव्हते त्यामुळे उच्च न्यायालयाने पदोन्नती आरक्षण जीआर 2004 रद्द करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायदा 2001 कायम ठेवलेला असताना व फक्त पदोन्नती च्या शासन निर्णय रद्द केला असताना नागराज प्रकरणातील अटीनुसार(QUANTIFYBLE DAT) एकत्र करून भटक्या-विमुक्तांना पर्याप्त प्रतिनिधी प्रतिनिधित्व नाही असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता सादर कमिटीने सदर कमिटीने चुकीच्या पद्धतीने सदर प्रवर्गात त्यांच्या न्याय संधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे सामाजिक न्याय बद्दलची बांधिलकी सतत सत्ताधार्यांकडे नाही हे यातून अधोरेखित होत आहे.
निवेदनावर भटके-विमुक्त हक्क परिषदेचे विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी, नागपूर जिल्हा मार्गदर्शक मधुकरजी गोस्वामी,
श्री दयालनाथ नानवटकर जिल्हा अध्यक्ष नागपूर, श्री नितेश जी पुरी जिल्हाध्यक्ष भंडारा, प्रदीप पुरी कार्याध्यक्ष नागपूर, गोवर्धनजी बडगे, विजय आगरकर, प्रवीण पाचंगे,भूषण गिरी, विकास पुरी, राजेंद्र गिरी,यशवंत कातरे, अंकित पवार, मुकेश राठोड, सतिश मोहनकर, आदींच्या समावेश यामध्ये होता

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *