

लोकदर्शन 👉
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती यांच्या हेल्थ कौन्सिलिंग राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण रुग्णालय जीवती. यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात *मिशन कवच-कुंडल* अंतर्गत कोवीड-19 लसीकरण अभियानानिमित्त समुपदेशन, लसीकरण व कोवीड-19 अँटीजेन टेस्ट चे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय जिवतीचे डॉक्टर श्री.आर पी अनकाडे वैद्यकीय अधिकारी , श्री एस एस कोरे लॅब टेक्नीशियन व बिंदू शामकुरे आरोग्य सेविका उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेतून डॉक्टर अनकाडे यांनी मागील काही कालावधीपासून देशात जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती त्यात वैद्यकीय सेवे सोबत सामान्य जनतेचे सहकार्य किती महत्त्वाचे आहे याचे त्यांनी मुद्देसूद विवेचन केले.शासनाने जे अभियान सुरु केले ते सर्वसामान्यांच्या हिताचे व आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायद्याचे असल्यामुळे यात प्रत्येकांनी सहभाग नोंदवुन संपूर्ण राष्ट्र कोविड मुक्त करण्यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे व आवश्यक आहे. असे म्हटले तर अध्यक्षस्थानावरुन डॉ. शाक्य यांनी आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्य सुद्धा कसे स्वस्त व निरोगी ठेवता येईल याची काळजी व उपाय करणे तितकेच महत्त्वाचे आहे असे म्हटले सदर अभियानांतर्गत महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांचे लसीकरण व कोवीड-19 अँटीजन टेस्ट करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेलंग तर प्रास्ताविक प्रा. लांडगे व आभार प्रा. मस्कले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. राऊत, पानघाटे ,देशमुख साबळे उपस्थित होते तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला.