गडचांदूर शहरात नवरात्र ची धूम

By : Mohan  Bharti

शहरात 40 सार्वजनिक मंडळांनी केली देवी ची स्थापना

गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर मध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहेत.
अमलनाला रोडवरील भवानी माता मंदिर,अचानक चौकात असलेल्या देवीच्या मंदिरात, तसेच कन्यका मंदिरात भाविक महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. कोरोना च्या नियमांचे पालन सर्वच सार्वजनिक मंडळाकडून करण्यात येत आहेत, मुख्य मंडळांनी विद्दुत रोषणाई केली आहे.  कोरोना मुळे गरबा कार्यक्रम कुठेही दिसत नाही. पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या शांतता समिती च्या सभेत सर्व दुर्गोत्सव व शारदोत्सव मंडळ च्या पदाधिकारी ना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. गडचांदूर शहरात 40 तर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात विविध गावात 75 ठिकाणी सार्वजनिक दुर्गा व शारदा मंडळांनी दुर्गादेवी व शारदादेवी ची प्राणप्रतिष्ठा केली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी दिली. शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *