अर्थ फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

लोकदर्शन👉 मोहन भारती


*⭕विविध सामजिक संघटना चा संयुक्त पुढाकार*

 

अर्थ फाउंडेशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग रक्तपेढी विभाग चंद्रपूर, पंचायत समिती जिवती , प्राथमिक आरोग्य केंद्र जीवती, गुरुदेव सेवा मंडल , ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन कोलाम विकास फाउंडेशन, रुद्र प्रतिष्ठान , गोर सेना , लहुजी ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड , हजरत टिपू सुलतान फाउंडेशन, चर्मकार महासंघ जीवती , पुरोगामी पत्रकार संघ ,महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, पोलीस विभाग जीवती, कृषी विभाग ,तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा आरोग्य विभाग पंचायत समिती जिवती प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने 7 ऑक्टोबर ला जीवती येथील पंचायत समिती सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला यामध्ये तालुक्यातील विविध कर्मचारी युवावर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते अशा एकूण *45* व्यक्तींनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती अंजना पवार यांच्या हस्ते करण्यात आले, अध्यक्षस्थानी उपसभापती महेश भाऊ देवकते होते, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यकार्यपालन अधिकारी खावरडे , संवर्ग विकास अधिकारी पेंदाम , तहसीलदार गांगुर्डे , सुभाष भाऊ राठोड, अशपाक भाई ,डॉ अंकुश गोतावळे, डॉ आहेरकर डॉ कुलभूषण मोरे ,बाल विकास प्रकल्प अधिकारी,जाधव , माजी न,प,सभापती हरिभाऊ मोरे , राजेंद्र परतेकी , भीमराव पवार सरपंच , विजय गोतावळे , सुनील जाधव दीपक गोतावळे , राजेश राठोड , जीवन तोगरेतसेच पंचायत समिती आणि तहसील ऑफिसचे सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी ढगे यांनी केले तर प्रास्ताविक अर्थ चे संचालक डॉ.कुलभूषण मोरे यांनी केली. या प्रसंगी अर्थ फाउंडेशन 2014 पासून जीवती सारख्या अतिदुर्गम भागात करीत असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्य बद्दल माहिती दिली ….मोफत आरोग्य शिबीर कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबिर महिलांसाठी मासिक पाळी जन जागृती अभियान मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दरवर्षी रक्तदान शिबिर अशे अनेक उपक्रम अर्थ फाउंडेशन सात वर्षापासून राबवत आहे असे यावेळी सांगितले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करीता रुग्नसेवक जीवन तोगरे , शीलवंत गायकवाड , भारत बिरादर , चंदू जाधव एव्हरेस्टवीर विकास सोयाम यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाकरिता रक्तदात्यांना अशपाक भाई शेख यांच्याकडून फळवाटप करण्यात आले , तसेच चहा पाण्याची व्यवस्था राजू बेल्लाळे यांच्या तर्फे करण्यात आली होती.. या कार्यक्रमात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेंद्र प्रत्येकी यांचे तसेच आतापर्यंत 30 वेळा रक्तदान करणारे मा विजय भाऊ गोतावळे आणि तालुक्यातील गोरगरिबांना मदत करणारे रुग्णसेवक जीवन तोगरे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *