परसोड़ा येथील भूमि अधिग्रहण महापंचायत सभा मोठ्या उत्साहात संपन्न

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर


प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्याला एकरी 25000/ रू भाव व प्रत्येकाला नौकरी मिळवून दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही
श्री हंसराजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचे प्रतिपादन

कोरपना तालुक्यातील परसोळा व परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली महापंचायत सभेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या रिलायन्स कंपनी आम्हाला योग्य मोबदला देत नाही आणि दलालामार्फत आमची पीळवणूक होत आहे आमच्या जमिनी गेल्यावर आम्ही बेरोजगार होनार आम्हाला नौकरी मिळवून द्या अशा विविध समस्या शेतकऱ्यांनी मांडल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हे होते तर प्रमुख पाहुणे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री प्रशांतजी घरोटे तालुका महामंत्री राजुरा,श्री विशाल जी गज्जलवार जिल्हा सचिव,श्री किशोरजी बावने सहकार आघाडी प्रमुख,श्री संजय भाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार अध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी माजी सरपंच, पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष श्री कवडू पाटील जरिले, श्री रामभाऊ मोरे नगरसेवक, श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक,श्री संदीपजी शेरकी,श्री शशिकांत आडकीने, श्री किशोर बावणे,श्री प्रभाकर आत्राम,श्री बेंडलेजी,श्री गंगाध कुंटावार, श्री कार्तिक गोंडलावार आदी मान्यवर उपस्थित होते माननीय श्री हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना
परसोळा व परिसरातील अतिदुर्गम भागात वसलेल्या परसोडा,कोठोडा (बु), गोविंदपुर,कोठोडा (खुर्द),रायपुर,पांडुगुडा व परिसरातील शेतकर्यांना जमिनीचा एकरी भाव 25000/ रू व प्रत्येक प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्याला नौकरी मिळवून दिल्या शिवाय स्वस्त बसणार नाही तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दलालामार्फत विकू नये गावात दलाल येऊ देने बंद करा मागील 14 वर्षापासून लाइम स्टोन मायनिंग करिता एमपी बिर्ला उद्योग समूहास मिळाली आहे परंतु अधिग्रहण प्रक्रिया चालू न केल्याने या जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे ग्रामपंचायतनी यापूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र सादर केले असल्याने उद्योग व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन या प्रयोजनार्थ कशाची प्रतीक्षा आहे असा सवालही त्यांनी या महापंचायत मध्ये उपस्थित केला स्थानिकांना रोजगार तसेच शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या व हक्कासाठी आपण त्यांच्यासोबत सदैव उभे राहू असे भाविक आश्वासन मा हंसराजजी अहिर यांनी या महापंचायत मध्ये उपस्थित केला तसेच शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उभेपीक व ठमाटर,कापूस इतर पीक उध्वस्त झाले याची पाहणी केली व शेतकऱ्यांना त्वरित शासनाने मदत जाहीर करावी व शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यांना सुद्धा न्याय देण्यात यावा तसेच मांडवा येथील डाहुले शेतकरी दाम्पत्याचा शेततळ्यात बैलांना पाणी पाजन्यासाठी गेले असता बैलगाडी उलटुन शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत त्वरित द्यावी व यांनी सुद्धा आर्थिक मदत केली कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी सखाराम तलांडे, पीतांबर कोंगुलवार,संजय सोलमवार,जयंत देवगडे,रामलु कुलबोईनवार,संतोष डोनेवार,रामलु बोईनवार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी केले व संचालन हरिदास पारखी यांनी केले तर आभार गंगाधर कुंटावार यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *