भा.ज.यु.मो जिल्हाध्यक्ष मा. आशिषभाऊ देवतळे यांच्या हस्ते नवरगाव येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शाखेचा फलक अनावरण सोहळा संपन्न.

By : Shivaji Selokar

गोर- गरीब, शोषित, वंचित व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा बुलंद करा – जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नवरगाव येथील भाजयुमो युवा वॉरियर शाखेचे फलक अनावरण भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष माननीय आशिष भाऊ देवतळे यांच्या हस्ते व जि.प समाजकल्याण सभापती मा. नागराजभाऊ गेडाम व भाजप तालुका अध्यक्ष राजेंद्रजी बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आशिषभाऊ देवतळे यांच्या युवा संवाद यात्रेची आज सुरवात झाली. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नवरगाव येथून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

या प्रसंगी नवरगाव भाजपा अध्यक्ष प्रकाशजी खोब्रागडे, जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे भाजयुमो तालुका अध्यक्ष रितेश अलमस्त, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा सचिव रोशन मुद्दमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष रितेश अलमस्त, भाजयुमो नगर अध्यक्ष मनिष घुघुसकर, भाजपा तालुका महामंत्री मनोहरराव सहारे, रामदासजी दुर्किवार, संजय बोडणे, संजय गभणे, मुकेश गाडेकर, युवराज लांजेवार, भोलाराम इंदुलवार, अमोल लोखंडे, संजय परसरामे, मनोज लांजेवार, नामदेवराव बोरकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *