स्व,अनंतराव चटप आश्रम शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले

By : Mohan Bharti

गडचांदूर : – स्व.अनंतराव चटप प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. शाळेत कुंडी प्रकल्प राबविण्यात आला,तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापीका कु,वैशाली कुंभारे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापीका कु,आशा एकरे होत्या,
याप्रसंगी सहाय्यक शिक्षक शेंडे व कुरेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषण मुख्याध्यापीका आशा एकरे यांनी केले, संचालन किशोर नगराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मडावी यांनी केले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *