Home
Home गडचांदूर / कोरपणा उपमुख्याध्यापीका शोभाताई घोडे सेवानिवृत्त संस्थेच्या वतीने भावपूर्ण निरोप

उपमुख्याध्यापीका शोभाताई घोडे सेवानिवृत्त संस्थेच्या वतीने भावपूर्ण निरोप

By : Mohan Bharti

गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर च्या उपमुख्याध्यापिका श्रीमती शोभा घोडे यांच्या नियत वयोमानानुसार 30 सप्टेंबर ला प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या, यानिमित्ताने सेवा निवृत्ती पर निरोप व सत्कार समारंभ आयोजित केला होता, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर चे उपाध्यक्ष श्री राहुल बोढे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे,गडचांदूर चे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे ,जेष्ठ संचालक श्री विठ्ठलराव थिपे, संचालक श्री विकास भोजेकर, मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिता चिताडे, उपप्राचार्य श्री विजय आकनूरवार, पर्यवेक्षक श्री अनिल काकडे महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी भालेराव, तसेच सत्कारमूर्ती उपमुख्याध्यापिका श्रीमती शोभा घोडे उपस्थित होत्या. याप्रसंगी श्रीमती शोभा घोडे यांना साडी , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निरोप समारंभ प्रसंगी बंडुभाऊ धोटे,विणा देशमुख, वैशाली हेपट, हरिओम तेलरांधे (नागपूर)यांनी मनोगत व्यक्त केले

 

विविध मान्यवरांनी श्रीमती शोभा घोडे यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देतांना श्रीमती शोभा घोडे यांनी आपल्या शालेय कामकाजात सर्वांची मिळालेली साथ तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीमती भारती घोंगे यांनी केले तर आभार श्री रवींद्र चौधरी यांनी मानले याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here