

By : Mohan Bharti
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड प्रतिनिधी/ दि. ३०विविध मागण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धरने आंदोलन केले करण्यात आले,
करुण शर्मा परळी येथे खोटी ॲट्रॉसिटी प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात येऊन दोषीवर कार्यवाही कारवी या मागणी साठी घरणे अंदलोन, बीड जिल्हयातील अल्पवयीन मुली, महिला यांचवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार ग्रस्त जिल्हा घोषीत करा. महात्मा ज्योतीबा फुले, आण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, वसंतराव नाईक, या महामंडळाचे कर्ज
माफ करावे व नविन कर्ज देण्यात यावे.मागासवर्गीय यांच्या ताब्यातील गायरान जमिनी २०१० पर्यंत त्यांच्या नावांवर करण्यात याव्यात. पारनेर ता. पाटोदा येथील पारधी समाजावरील हल्लेखोरांना कडक कारवाई करण्यात यावी.
बीड जिल्हयातील अनुसूचित जाती जमाती वर अन्याय, अत्याचार होत असुन पालक मंत्री तथा समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे फक्त बघ्याची भुमीका घेत आहेत. समाज कल्याण खात्याला बजट आगावी अनेक योजना बंद पडत आहेत. समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे समाज कल्याण खात्याच्या विविध विकास योजने कडे दुर्लक्ष करीत असुन चुकीच्या योजनांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना हटवा व समाज कल्याण खाते वाचवा अशी मागणी आपल्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत आहे. यावेळी धरणे आंदोलनास उपस्थित अनिल तुरुकमारे मराठवाडा सचिव, अरूण सवई श्रीरंग वाघमारे, दत्तात्रेय सौंदरमल शेख फिरोज अशोक टकले ज्ञानेश्वर सोनवणे गंगाराम हिरवे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.