महात्मा गांधी विद्यालयात आझादी का महोत्सव अंतर्गत दौड स्पर्धा चे आयोजन,,

. लोकदर्शन👉 मोहन भारती


,🔸,,आदित्य तुपसुंदर व अंजली सलगर ठरले अव्वल,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे, “”आझादी का महोत्सव”” फिट इंडिया फॉर रन अंतर्गत 2 किलोमीटर रनिंग स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि,25) करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक तथा गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.अनिलराव चिताडे ,परीक्षा नियंत्रक गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली यांच्या हस्ते करण्यात आले,प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे,मुख्याध्यापिका सौ.स्मिता चिताडे , उपमुख्याध्यापिका शोभा घोडे ,पर्यवेक्षक अनिल काकडे ,पंचायत समिती चे तज्ज्ञ मार्गदर्शक विलास भांडारवार होते ,शारीरिक.शिक्षक संजय झाडे अमोल शेळके, बी. बी.भोयर,प्रा.प्रशांत पवार,यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.
2 किलोमीटर च्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक आदित्य तुपसुंदर,व अंजली सलगर,यांनी पटकीवला.द्वितीय क्रमांक हर्ष कोचेवाड, व सोनल फाये यांनी तर तृतीय क्रमांक आशिष ढोके व अमीक्षा शेंडे यांनी प्राप्त केला,विजेत्या धावपटू ना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व बक्षिस अतिथीच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले.या दौड स्पर्धेत 75 मुले व मुलींनी सहभाग घेतला,कार्यक्रमाचे संचालन तथा आभारप्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी केले,याप्रसंगी शाळेचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *