

लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा येथील रमाबाई नगर वार्ड चे रहिवासी मागील ३०-३५ वर्षापासून वास्तव्य करून राहत आहेत. दरवर्षी न चुकता, नगर परिषद, राजुरा, ला कर भरित आहे. नगर परिषद, राजुरा, हे आम्हाला आमच्या नावाने घर भरल्याबाबतच्या कर पावत्या दर वर्षी देत आहे. परंतु सदर घर उप पावत्या वर नगर परिषद, राजुरा, कडुन अतिक्रमण हा शब् टाकला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना शासनाकडून मिळणारे फायदे व बँकेकडून कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत असतात याबाबत नगर परिषद राजुरा यांना विचारणा केली असता, ते आमच्या हातात काही नाही, असे उत्तर देतात रमाबाई नगर, राजुरा येथे ने जवळपास ७५०-८०० कुटुंब वास्तव करतात. ही जागा, नगर परिषद, राजुरा, च्या गावठान हददीला लागुन आहे. सदर जामा गावठान हददीत समाविष्ठ केल्यास, नगर परिषद, राजुरा, च्या रेकॉर्ड वरून, अतिक्रमण हा शब्द निघुन जाईल. करिता रमाबाई नगर वार्ड येथील जागा नगर परिषद, राजुरा, च्या गावठान हददीत समाविष्ठ करण्यात यावी व नगर परिषद, राजुराच्या रेकॉर्डवरून बेघर अतिकम हा शब्द हटविण्याचे आदेश पारीत करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन स्थानिक नागरिकांनी अॅड चंद्रशेखर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष अरुण धोटे, आमदार सुभाष धोटे यांना दिले आहे.