

लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर:- कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी-धूनकी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी निमणी ग्रामपंचायत उपसरपंच उमेश राजूरकर यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच आमदार सुभाष धोटे यांना निवेदनातून केली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी निमणी-धूनकी रस्त्याचे सिंगल कोट डांबरीकरण करण्यात आले होते पण काम निकृष्ट दर्जाचे केल्याने हा रस्ता अवघ्या एक दोन वर्षात पूर्णपणे मातीत मिळाल्याने या भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे.
याचं मार्गे राजुरा-निमणी -गडचांदूर अश्या चार बसफेऱ्या सुरू आहे पण रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडल्याने पावसात पाणी साचून असल्याने वाहचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे बस सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आपण तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे,