गडचांदूर व्यापारी असोशियनचा कोरोना विरुद्ध लढण्याचा निर्धार

By : Shivaji Selokar

गडचांदूर : कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यापारी बंधूना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला , तर अनेक व्यापाऱ्याचे निधन झाले.मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज असून शासन निर्देशाचे पालन करीत लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी शहरातील समस्त व्यापारी बंधूना प्रेरित करून ,प्रत्येक व्यापारी बंधूना मास्क- सॅनिटायझर – सोशल डिस्टंसिंग चा वापर करण्यासाठी आग्रह धरू .आणी शासनाच्या ‘ मी जबाबदार /स्वयंशिस्त ,संयम व दक्षता ‘ या घोषवाक्याचे पालन करून शासनाला सहकार्य करू असा निर्धार गडचांदूर व्यापारी असोशियन तर्फे करण्यात आला आहे . व्यापारी असोशियन गडचांदूरच्या दि.20 सप्टेंबर रोजी ,हॉटेल चांदणी चौक गडचांदूर येथे झालेल्या सभेत हा निर्धार करण्यात आला . सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री ,सचिव विवेक पत्तीवार , गडचांदूर व्यापारी असोशियनचे अध्यक्ष हंसराज चौधरी , सचिव प्रशांत गौरशेट्टीवार ,उपाध्यक्ष धनंजय झांजेळ उपस्थित होते . छोटेखानी झालेल्या सभेत व्यापारी बांधवाना येणाऱ्या विविध अडचणीवर चर्चा करण्यात आली. सभेला रवि गेल्डा ,मनोज भोजेकर , राजू सचदेव , जावेद मिठाणी , सलीम भाई , चंदू वडस्कर , शिरीष भोगावार ,विठ्ठल वैद्य , प्रशांत दरेकर , मारोती चापले सचिन निले आदी व्यापारी बंधू उपस्थित होते .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *