भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी:-सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji selokar

पिपरी व भोयगाव येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नारंडा ग्रामपंचायततर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार

एन्यूटी हायब्रीड अंतर्गत भोयगाव-गडचांदुर व नारंडा फाटा-पवनी रस्ता मंजूर केल्याबद्दल नागरिकांनी व्यक्त केला आनंद

भारतीय जनता पार्टी हे समाजाच्या अंतिम घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे,त्यामुळे भारतीय जनता पक्ष्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेची अविरत सेवा करावी असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.यावेळी ते भारतीय जनता पार्टीच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
कोरपना तालुक्यातील पिपरी व भोयगाव येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतला.यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पिपरी येथील महादेव पावडे,रफीक खा पठाण, विजय ढवस,संतोष चालेकर,गजानन तुरणकर,देवीदास काकडे,उमेश तुरणकर तसेच भोयगाव येथील दिनेश दवंडे, दत्तू पोटे,पिंटू लवाडे,दत्तू वांढरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे ग्रामपंचायत मध्ये ९ पैकी ७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली,तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती पैकी नारंडा येथे भारतीय जनता पक्षाचे स्वबळावर सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे त्याबद्दल ग्रामपंचायत नारंडा तर्फे लोकलेखा समितीचे अध्यक्ष,आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हार टाकून सत्कार केला.
तसेच यावेळी नारंडा ते शेरज खुर्दच्या पूल व रस्त्याकरिता ३ कोटी रुपये व नारंडा येथील पोचमार्गाच्या रस्त्याकरिता १कोटी रुपये निधीची मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली सदर मागणीच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न करू असे यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
तसेच एन्यूटी हायब्रीड अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व अँड.संजय धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या भोयगाव ते गडचांदुर व नारंडा फाटा-अंतरंगाव-कवठाळा-पवनी रस्ता मंजूर होऊन काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी यावेळी आंनद व्यक्त केला.तसेच कोरपना तालुक्यातील एन्यूटी हायब्रिड अंतर्गत सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आशिष ताजने यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.
तसेच बोरगाव इरई येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत होते त्यांना सोलर बॅटरी मशीन देण्यात यावी याकरिता उपवनसंरक्षक यांना सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे निर्देश देण्यात आले.
तसेच भारोसा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आधीपासून वर्ग २ असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करायला अडचणी निर्माण होतात याकरिता वर्ग १ होण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली त्यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांना शिबीर घेण्यासाठी सांगितले.
नारंडा,पिपरी,भोयगाव,भारोसा,इरई,बोरगाव येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी नारंडा येथील सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,भारोसा सरपंच देवराव निमकर,नारंडा माजी सरपंच वसंता ताजने,पिपरी माजी सरपंच कवडू कुंभारे,भोयगाव माजी सरपंच बंडू जुनघरी,माजी सरपंच विठ्ठल उपरे,भारोसा माजी सरपंच संभाजी निखाडे यांची उपस्थिती होती.
नारंडा व पिपरी येथील अनिल मालेकर,अजय तिखट, सत्यवान चामाटे,प्रवीण हेपट,अनिल शेंडे, अनिल चांदेकर,भाऊजी तिखट,साईनाथ तिखट,वैभव तिखट,अरुण निरे,गजानन चतूरकर,रवींद्र कांबळे नारंडा ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे, रंजना शेंडे,शालिनी हेपट,परसूटकर
बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अरुण नवले,गोकुळदास बुच्चे,नरेंद्र धाबेकर,विजय देवतळे,खुशाल नगराळे,प्रमोद दरेकर,उत्तम वनकर,मधुकर, श्रीकांत बुच्चे,भारत पथाडे,सूर्यभान धाबकेर उपस्थित होते.
भारोसा येथील बापूराव मटाले, रामचंद्र आगलावे,अंकुश मटाले,रामदास रोगे,श्रीधर रोगे,संतोष गोरे उपस्थित होते.
इरई येथील राहुल पायघन,अनिल गेडाम,स्वप्नील वरारकर,विठ्ठल बोबडे,महेश मांदाडे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *