

लोकदर्शन 👉 महेश गिरी (नागपूर)
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
मा.ना.श्री विजय वडेटटीवार साहेब (मंत्री बहुजन कल्याण) यांचे आभार
मा.श्री कर्मवीर दादासाहेब ईदाते यांचे आभार
16 जुलै 2021रोजी भटके विमुक्त हक्क परिषदेने मा ना वडेट्टीवार साहेब याचे बरोबर शासकीय मीटिंग घेतली, त्यामीटिंग मध्ये 9 विभागाचे सचिव हजार होते. त्यामीटिंग मध्ये हक्क परिषदेने भटके विमुक्त समाजाचे केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या पत्राच्या आदेशानुसार घर-घर सर्वेक्षण करावे व 2008 चा जी आर पुनर्जीवित करावा अशी आग्रही लेखी मागणी केली होती. त्या मीटिंगमध्येच मंत्री मोहोदयानी भटके विमुक्त हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांना वचन दिले होते की, हे विषय मी नक्की मार्गी लावेल. त्याचाच परिपाक म्हणुन काल दि 8/9/2021 रोजी मा दादा इदाते व मा मंत्री वडेट्टीवार साहेब यांचे बैठकीत सदर निर्णय जाहीर करण्यात आला. व आज दि9/9/2021 रोजी सर्वेसाठी नोडल ऑफिसर म्हणून अंडर सेक्रेटरी श्री आनंद माळी यांची नियुक्ती करण्यात आली.या दोन्ही शासकीय बैठका लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी अथक परिश्रम घेतले व वरील विषय मार्गी लावला त्याबद्दल भटके विमुक्त हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्यांचे व मा ना वडेट्टीवार साहेब तसेच मा.दादा इदाते यांचे भटके विमुक्त हक्क परिषदे तर्फे खुप खुप अभिनंदन व आभार💐💐💐–
समस्त पदाधिकारी व संघटक
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र