जेसीज च्या वतीने प्रा. प्रफुल्ल माहुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले

By : Mohan Bharti

गडचांदूर :  जेसीआय राजुरा रायल्स च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील इंग्रजी विषयाचे प्रा, प्रफुल्ल माहुरे यांना जाहीर झाला. शिक्षक दिनी एका समारंभात प्रा, प्रफुल्ल माहुरे यांना शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, व सन्मानपत्र जेसीज चे पदाधिकारी नरेंद्र बरडीया व भरत बजाज यांच्या शुभ हस्ते देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जेसीज चे पदाधिकारी सुषमा शुक्ला, स्मृती व्यवहारे, जयश्री शेंडे,सुशीला पोरेड्डीवार, मंजू गौतम, मधूस्मिता पाढी,रितू पानथरे,डॉ, मनीषा पाटणकर,रेखा बोढे,स्वतंत्रकुमार कृष्णदत्त शुक्ला उपस्थित होते. राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राजुरा जेसीज च्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनी सन्मानित करण्यात येते,यावर्षी सुद्धा तिन्ही तालुक्यातील शिक्षक बंधू,भगिनी ना सन्मानित करण्यात आले. प्रा, प्रफुल्ल माहुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल प्राचार्या स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार ,तथा इतर हितचिंतकानी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *