

संदिप आदे, उमेश मिलमीले, राहुल मालेकर यांची निवड.
राजुरा :– काँग्रेस ओबीसी विभाग चंद्रपूर च्या वतीने लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुका काँग्रेस ओबीसी विभाग चे ग्रामीण व शहर तालुकाध्यक्ष यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राजुरा काँग्रेसचे ओबीसी ग्रामीण तालुकाध्यक्ष म्हणून उमेश रघुनाथ मिलमिले व राजुरा शहराध्यक्ष संदीप आदे यांची निवड करण्यात आली. तर ओबीसी विभाग ग्रामीण कोरपना तालुकाध्यक्ष म्हणून राहुल देविदास मालेकर यांची सुद्धा निवड करण्यात आली.
या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, सुरेश पाटील मालेकार यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.