वेकोलीने खाण परिसरातील ग्राम पंचायतींमध्ये विशेष कामे मार्गी लाववी.

By : Mohan Bharti 

नंदकिशोर वाढई यांचे वेकोली महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

राजुरा  :– खाणीच्या वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या परिसरातील कळमना, माथरा, चिंचोली, कोलगाव, सास्ती, धोपटाळा, रामपूर, गोवरी, बाबापूर, मानोली, कढोली, साखरी, गोयेगांव, हिरापूर, पवनी, ही गावे आहेत. ही सगळी गावे डब्ल्यु. सी. एल. खाणीच्या विळख्यात आहेत आणि या गावामध्ये डब्ल्यु. सी. एल. खाणीमुळे असंख्य समस्या शेतक-यांच्या गावक-यांच्या निर्माण झाल्या आहेत. त्यात प्रामुख्याने रामपूर ते कवठाळा मार्ग पूर्णतः खराब झालेला आहे. तो लवकरात लवकर दुरूस्त करण्यात यावा, परिसरातील सर्व गावातील पाणी पातळी खालावली आहे. त्यासाठी डब्ल्यु. सी. एल. नी त्या प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या स्त्रोत निर्माण करून द्यावे, येथे सि. एस. आर. चे कुठलेही काम झालेले नाही तरी सि. एस. आर. च्या माध्यमातून केंद्र व राज्याच्या निकषाप्रमाणे स्थानीक मुलभुत सोयी-सुविधा निर्माण करून द्याव्यात, खाणीत ज्या खाजगी कंपण्या काम करीत आहेत त्यात स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, नविन जमीन भुसंपादनानंतर स्थानीक शेतक-यांच्या मुलांना स्थानीक खाणीमध्येच नोकरी द्यावी, गावामध्ये जंगली प्राणी, हरीण, डुक्कर, निलगाय, वाघ यांचा जे झुडपे जंगल व बोगदे तयार झाले आहे घुमाकुळ खुप आहे ते रात्रभर या सगळ्या गावाच्या शेतक-यांच्या शेतामध्ये जावून प्रचंड नुकसान करीत आहे, तरी ते झुडपे, जंगल व बोगदे लेवल करून साफ करावे व शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, वेकोलीने पर्यावरण राखण्याकरीता परिसरात काम करावे, परिसरातील वेकोलीने भुसंपादन न केलेल्या जमीनीचे सुध्दा संपादन करून शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात, परिसरातील गावात अंतर्गत रस्त्यावरून वेकोलीची वाहणे ये जा करतात अनेक ठिकाणी ते पूर्णतः खराब झालेले आहेत. त्याची सुध्दा देखभाल दुरूस्ती करावी, अपघात झालेल्यांना आर्थीक मदत व मृतकांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे, ध्वनी व धुळ प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, यातून निर्माण होणाऱ्या आजारांवर गावामध्ये आरोग्य शिबीरे घेऊन त्यांचे निर्मुलन करावे, वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी २० दिवसात प्रयत्न करावे तसे न झाल्यास या सर्व गावातील ग्राम पंचायत सरपंच, शेतकरी, गावातील तरुण यांच्या माध्यमातून वेकोली विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल व त्याला सर्वस्वी वेकोली महाप्रबंधक जबाबदार असतील असा इशारा काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या महाप्रबंधकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, राजुरा तालुका अध्यक्ष तथा गोवरीचे उपसरपंच उमेश र. मिलमिले, धोपटाळाचे सरपंच राजू पिंपळशेंडे, लहू चहारे, बालाजी चहारे यासह गावकरी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *