पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजुरा महिला काँग्रेसचे विशेष योगदान


लोकदर्शन 👉 मोहन भारती
*🔶मदत साहित्य घेवून निघालेल्या वाहनाला आमदार सुभाष धोटे यांनी दाखविली हिरवी झंडी.*

राजुरा :– निसर्गाच्या अवकृपेने अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली, कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्या अन्य भागात भयंकर पुरस्थिती उदभवली आहे. आपले बांधव प्रचंड दुःखात आहे त्यांना सावरण्यासाठी, त्यांचे जनजीवन पुर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी मदतीसाठी आवाहन केले होते. याची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लोकसहभागातून जीवनावश्यक साहित्य गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
यात नागरिकांनी आपल्या सोयीनुसार साहित्य महिला काँग्रेसच्या सदस्यांकडे स्वयंस्फूर्तीने जमा केले. तसेच महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुध्दा मदत केली आहे. यात प्रामुख्याने लहान मुलांचे कपडे , नविन कपडे, लेडीज गारमेंटस,महिलांचे कपडे, कपडे , टॉवेल , सॅनिटरी नॅपकीन , नविन साड्या , बिस्केट, इंस्टट फुट, मॅरीगोल्ड बिस्केट, बिस्कीट पुडे, फलहारी चिवडा , चना डाळ, तुर, मुंग, डाळ, मसूर , मुंग, डाळ, सॅनिटायझर-मास्क, आटा, मीठ , तांदुळ , खाद्य तेल , तिखट हळद, चहापत्ती , तेल , बेसन, रिन साबण , अंघोळीचा साबण, साखर, चहापत्ती/मसाला /तेल बॉक्स, हळद, तिखट, मॅरीगाॅल्ड बिस्किटे, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे बाँक्स राजुरा येथून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन पुणे येथे पाठवण्यात आले. तेथे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले मदत साहित्य एकत्रित करून नंतर ते पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत. पुरपरीस्थितीमुळे विस्कळीत झालेल्या आपल्या परीजनांना मदतीचा हात घेवून निघालेल्या वाहनाला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी आज हिरवी झंडी दाखवून रवानगी केली.
या प्रसंगी सर्व मदत करणाऱ्यांचे तसेच हे साहित्य गोळा करणे, पॅकिंग करणे याकरिता परिश्रम घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, जि. प सदस्य मेघाताई नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, प स सदस्या कुंदा जेनेकर, नगरसेविका दिपा करमनकर, वज्रमाला बतकमवार, माजी सभापती निर्मला कुळमेथे, पुनम गिरसावळे, अर्चना गर्गेलवार, योगिता मटाले, उज्वला कातकर या सर्वांचे विशेष आभार मानण्यात आले. या प्रसंगी वरील सर्व मान्यवरांसह जि प सदस्य मेघाताई नलगे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता उपरे, नगरसेविका शारदा टिपले, गीता रोहने, कृतीका सोनटक्के, संगीता धोटे, नंदा गेडाम, सरपंच शालु लांडे, भारती पाल, शुभांगी खामनकर, रेखा बोढे, सुनंदा मोहुर्ले, संगीता मोहुर्ले, मनिषा देवाळकर, सुप्रिया गेडाम, मीना लांडे, वनिता मून, कविता मोरे, अर्चना गर्गेलवार, लता डाखरे, मिना गोप, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, प स सदस्य रामदास पुसाम, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, शहराध्यक्ष अशोक राव, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदु वाढई, अविनाश जेनेकर, अनिल धोटे, संदेश करमरकर, सारंग गिरसाळवे, कामगार नेते शंकर दास, सेवादलाचे वामन वाटेकर, अशोक मून, राहुल उमरे, संतोष मडाहोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *