

यवतमाळ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पांढरकवडा जिल्हा सेवा विभागाच्या *संस्कृती संवर्धक मंडळ, यवतमाळ* द्वारा आयोजित कार्यक्रमात *”रुग्णवाहिका लोकार्पण”* सोहळा पांढरकवडा जि. यवतमाळ येथे *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहिर, रा. स्व. संघाचे जिल्हा* *संघचालक मा. गोविंदरावजी हतगावकर, मा. विदर्भ प्रांत सेवा प्रमुख मा. सुनिलजी मेहेर, प्रांत* *सह्बौद्धिक प्रमुख मा. आनंदजी पांडे* यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास संस्कृती संवर्धक मंडळाचे सचिव मा. सुनिलजी खातखेळकर, रा.स्व. संघाचे तालुका संघचालक मा. विष्णुपंतजी पाटील, नगर संघचालक मा. डॉ किरणजी माई यांचेसह अन्य मान्यवर प्रभृतीची उपस्थिती होती. याप्रसंगी आपले मनोगतात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांनी पांढरकवडा शहरातील सर्वसामान्य व गरजवंत रुग्णांना हि रुग्णवाहिका साहाय्यभूत ठरेल असे सांगितले.