कठोर परिश्रमातूनच यशाचा मार्ग सुकर – हंसराज अहीर

 

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

*⭕वणी येथे गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान*
अविश्रांत परिश्रमातूनच यशाला गवसणी घालता येते. त्यामुळे आजच्या सन्मानाला सार्थ असलेल्या *गुणवंत विद्यार्थ्यांनी* परिश्रमाची शिकस्त करून यश संपादन केले आहे अशा गुणवंतांच्या बळावरच भविष्यात देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल शक्य होईल असा विश्वास *पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर* यांनी *गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास* संबोधित करतांना व्यक्त केला.
*दि २२ ऑगस्ट रोजी भाजयुमो वणी शहर च्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या* सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अहीर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना पुढील शैक्षणिक यशाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ संजीवरेड्डी बोदकुरवार जी , ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, विजय पिदूरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, श्रीकांत पोटदुखे, किशोर बावणे, नितीन वासेकर, बंडू चांदेकर, संदीप बेसरकर, सत्यजित ठाकूरवार, वैभव कवरासे, शुभम गोटे, शुभम इंगळे, वैभव कळसकर, निखिल काळे, वैभव मांडवकर, प्रदीप बांदूरकर, मोरेश्वर कुत्तरमारे, आकाश मोहाडे, अक्षय देठे, वैभव मेहता, प्रज्वल ठेंगणे यांचेसह आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास पालक, शिक्षकवृंद, शहरातील गणमान्य नागरिक व श्रोता वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्र के बूथ सशक्तीकरण अभियान को लेकर क्षेत्र के सभी विधानसभा के संयोजक एवं मंडल अध्यक्ष उपस्थित थे। चंद्रपूर महानगर स्थित आयएमए हॉल मे आयोजित बैठक मे बूथ सशक्तीकरण, पक्ष संघटन मे मजबुती, लोकसभा, विधानसभा चुनाव के संबंध मे नियोजनबद्ध तयारी आदि विषयोपर मार्गदर्शन किया गया| इस बैठक मे वन तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक संजीवरेड्डी बोदकुरवार, चंदनसिह चंदेल व अन्य नेतागण उपस्थित थे ।
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील बूथ सशक्तीकरण संदर्भात चंद्रपूर येथील आय.एम.ए. सभागृहात झालेल्या बैठकीस सहा ही विधानसभेचे संयोजक व मंडळ अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत बूथ सशक्तीकरणाच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाच्या माहिती बरॊबरच पक्ष मजबुतीकरण लोकसभा, विधानसभा पूर्वतयारी तसेच संघटनात्मक कार्यरचना या सारख्या महत्वपूर्ण बाबींवर तसेच अन्य विषयावर मार्गदर्शन केले. या बैठकीस वने व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ नेते चंदनभैय्या चंदेल, देवराव भोंगळे, संजय धोटे, विजय राऊत, राजेंद्र गांधी, तारेंद्र बोर्डे, अहतेशाम अली यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *