संगणकशास्त्र अभ्यासक्रमासाठी आर्थीकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आमदार सुभाष धोटे यांनी निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

राजुरा :– संगणकशास्त्र अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या शेकडो ओबीसी / एन. टी / व्ही. जे. एन.टी/एस.बी.सी. खुल्या प्रर्वगातील / आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या राजश्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती शिष्यवृत्ती योजनेच्या ६०५ कोर्सच्या यादीमध्ये बी.सी.ए. व एम. एस्सी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमाचा समावेश करून उक्त प्रवर्गातील विध्यार्थांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळेल व उक्त प्रवर्गातील गोर गरीब होतकरू विद्यार्थी संगणकशास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करून स्वावलंबी होऊ शकेल.
तरी संगणकशास्त्र या अभ्यासक्रमांसाठी ओबीसी / एन.टी/ व्ही. जे. एन.टी/ एस. बी.सी. खुल्या प्रर्वगातील / आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील शिष्यवृती सुरू करण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री, मदत व पुर्नवसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *