राजुरा काँग्रेसतर्फे खा. राहुलजी गांधी यांचा वाढदिवस संकल्पदिन म्हणून साजरा.


लोकदर्शन 👉 मोहन भारती
काँग्रेसतर्फे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप.

राजुरा :– भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा युवादिल नेते *लोकप्रिय खासदार मा. श्री. राहुलजी गांधी* यांचा वाढदिवस राजुरा काँग्रेसचे वतीने संकल्पदिन म्हणून साजरा करण्यात आला. *आमदार सुभाष धोटे* यांचे मार्गदर्शनात *उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे ठिक सकाळी 11:00 वाजता* राजुरा तालुका काँग्रेस, सेवादल, महिला, युवक, किसान, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, अनु. जाती जमाती विभाग, एनएसयूआय, शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने रुग्णालयात उपस्थित सर्व *रुग्णांना फळे वाटप* करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून तन-मन-धनाने सेवा कार्य करण्याचा संकल्प आणि निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपजिल्हा रुग्णालय राजुराचे अधिक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. डाहुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, उपसभापती मंगेश गुरणुले, नगरसेविका दिपा करमनकर, वज्रमाला बतकमवार, युवक तालुका अध्यक्ष संतोष शेंडे, युवक शहराध्यक्ष अशोक राव, योगिता मटाले, पूनम गिरसाळवे, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर, रेखा बोढे, नंदा गेडाम, वरकडे मॅडम, विकास देवाळकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, पंढरी चंन्ने, सारंग गिरसाळवे, धनराज चिंचोलकर, जब्बार शेख, मारोती बोढेकर, उमेश गोरे यासह कांग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *