२०१९ च्‍या अतिवृष्‍टीतील लाभार्थ्‍यांना तातडीने घरे मंजुर करा – आ. सुधीर मुनगंटीवार

 लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*घरकुल लाभार्थ्‍यांचा प्रश्न विधीमंडळात उपस्थित करणार*
*कोठारी येथील पाणी पुरवठा योजना तातडीने पुर्ववत सुरु करा*

२०१९ मध्‍ये महाराष्‍ट्रात झालेल्‍या अतिवृष्‍टीमध्‍ये हजारो घरे जमीनदोस्‍त झाली. त्‍यामुळे या अतिवृष्‍टीतील पिडीतांसाठी शासनाद्वारे घरे घोषित करण्‍यात आली. यामध्‍ये राज्‍यातील १२ जिल्‍हयांचा समावेश होता. मात्र ऐनवेळी योजनेतुन चंद्रपूर जिल्‍हयाला वगळण्‍यात आले. त्‍यामुळे ५५८ लाभार्थ्‍यांना अद्याप घरे मिळालेली नाही. हा विषय अतिशय संवेदनशिल असुन या अन्‍यायाच्‍या विरोधात विधीमंडळातआपण प्रश्‍न उपस्थित करणार असल्याचे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. तसेच कोठारी येथील पाणी पुरवठा योजनेतील ४९६ नळ कनेक्‍शन तात्‍काळ सुरु करण्‍यात यावे. त्‍याचप्रमाणे ड यादीतील घरकुलांना शबरी व रमाई योजनेतुन घरकुल वितरित करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दिनांक १७ जुन २०२१ ला घेण्‍यात आलेल्‍या झूम बैठकीमध्‍ये आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. २०१९ मध्‍ये महाराष्‍ट्रात अतिवृष्‍टी झाली. यामध्‍ये हजारो घरे जमीनदोस्‍त झाली. त्‍यामुळे शासनाद्वारे या अतिवृष्‍टीतील पीडीतांना घरे वाटप करण्‍यात आली. मात्र ऐनवेळी यातुन फक्‍त चंद्रपूर जिल्‍हयालाच वगळण्‍यात आले. अशी सापत्‍न वागणूक फक्‍त चंद्रपूर जिल्‍हयालाच का? असा प्रश्‍न आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, पोंभुर्णा पंचायत समिती सभापती कु. अल्‍का आत्राम, उपाध्‍यक्ष ज्‍योती बुरांडे तसेच सोमेश्‍वर पद्मगीरीवार, कोठारीचे सरपंच मोरेश्‍वर लोहे, बल्‍लारपूर बी.डी.ओ. दवडे, पोंभुर्णा बी.डी.ओ. मरस्‍कोल्‍हे, महाराष्‍ट्र जीवन प्राधीकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
२०१९ मध्‍ये महाराष्‍ट्रात अतिवृष्‍टी झाली. त्‍यावेळी १२ जिल्‍हयातील लाभार्थ्‍यांना घरे मंजुर करण्‍यात आली. मात्र या योजनेमधून फक्‍त चंद्रपूर जिल्‍हयाला वगळण्‍यात आले. हा विषय अतिशय संवेदनशील असुन चंद्रपूर जिल्‍हयातील लाभार्थ्‍यांवर अन्‍याय झाला आहे. या अन्‍यायाच्‍या विरोधात विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित करुन लाभार्थ्‍यांना न्‍याय मिळवून देणार असल्याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.
कोठारी पाणी पुरवठा योजना खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यासाठी विधानसभेच्या माध्यमातून मोठा संघर्ष केला आहे. मुळात ही योजनाच संघर्ष करुन आणलेली आहे. तिच योजना आज बंद आहे. हे फार मोठे दुर्दैव आहे. मागेल त्‍याला पिण्‍याचे पाणी मिळालेच पाहीजे हे आपले धोरण असले पाहीजे. येत्‍या सात दिवसाच्‍या आत कोठारी पाणी पुरवठा सुरळीत करण्‍याचे आदेश जीवन प्राधीकरणाच्‍या अधिका-यांना आ. मुनगंटीवार यांनी दिले.
तसेच ड यादीतील घरकुल योजना तातडीने मार्गी लावण्‍याचे आदेश यावेळी दिले. ३ मार्च २०२० पासून घरकुल योजनेची साईट बंद आहे. त्‍यामुळे ड यादीतील रिक्‍त घरकुलांना मंजुरी मिळण्‍यास अडचण निर्माण झाली आहे. त्‍यामुळे अनेक लाभार्थ्‍यांना शबरी व रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही आहे. महाविकास आघाडी शासनाने घरकुल योजनेचे बंद असलेली साईट तात्‍काळ सुरु करुन लाभार्थ्‍यांना घरकुलाचे वाटप करावे. तसेच ड यादीमध्‍ये आणखी नव्‍या लाभार्थ्‍यांच्‍या नावांचा समावेश करावा असे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *