आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते रस्ते विकासकामांचे भूमिपूजन.

By : Mohan Bharti

राजुरा तालुक्यातील तुलाना, वरूर रोड, भेदोडा, टेंबुरवाहीचा समावेश.

राजुरा  :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यातील तुलाना, वरूर रोड, भेदोडा, टेंबुरवाही येथे २५:१५ ग्रामीण विकास निधी २०१९- २० अंतर्गत मंजूर रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा तुलाना येथे १५ लक्ष रुपये, मौजा वरूर रोड येथे १५ लक्ष रुपये, मौजा भेदोडा येथे १० लक्ष रुपये, मौजा टेंबुरवाही येथे १५ लक्ष रूपये मंजुर निधीच्या अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते विकासकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर गावात रस्ता विकास कामांना प्राधान्य दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले.
या प्रसंगी सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरणुले, प स सदस्य रामदास पुसाम, वरुड रोड चे संगीता कोडापे, उपसरपंच रमेश काळे, सदस्य गणपत पंधरे, भाऊराव ढुमने, देवाजी भोंगळे, मोरेश्ववर धानोरकर, बाबुराव कंबकवार, सिनु वल्ला, विकास वडस्कर, धनराज अवघान, नामदेव जानवे, देवराव ढुमने, मुकुंदा घुगुल, अशोक आत्राम, श्याम मोडक, राजु उरकुडे, प्रकाश ठावरी, ग्रामसेवक मरापे, संघटीत महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष माधुरी पुसाम, उपाध्यक्ष सुरेखा बोरकुटे, सचिव लैजाबाई रामटेके सोनु कंबकवार, प्रिया बोरकर, भेदोडाचे सरपंच पुरूषोत्‍तम नैताम, सदस्य मारोती आत्राम, पंढरी दुरुटकर, नथ्थू कोंडावाट, नारायण राऊतवार, बापू राऊतवार, रंजित पिंपळकर, विनोद देबटवार, मारोती सिडाम,
विकास पिंपळकर, गजानन नैताम, बबन सातपुते, अशोक देबटवार, अक्षय कोंडावार, मुर्लीधर कांबडे, संजय उईके, सुरेश ठाकरे, विश्वनाथ सरकुटलावार, चंदु नागूलवार, मारोती पिंपळकर, मारोती गादंगीवार, अमृत बोबडे, सतीश कांबडे, अंगणवाडी सेविका अर्चना सिडाम, आशा होरे, टेंबुरवाहीचे सरपंच रत्नमाला गेडाम, उपसरपंच चेतन जयपूरकर, सदस्य रवींद्र कुरवटकर, मनोहर रणदिवे, अर्जुन अलगमकर, दशरथ चापले, गुणवंत कुळसंगे, पो. पाटील विनोद खनके, गणपत जयपूरकर, शंभुजी गेडाम, विजय रणदिवे, मंगेश जगताप तुलानाचे प्रेम राऊत, वांढरे पाटील, किशोर मडावी, सुमटकर पाटील, निलेश राऊत यासह तुलाना, वरूर रोड, भेदोडा, टेंबुरवाही येथील ग्रामस्थ उपस्थीत होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *