युवतींनो रक्‍तदानासाठी पुढे या – राखी कंचर्लावार


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*आ. सुधीर मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे रक्‍तदान शिबिर*

*स्वेच्छा रक्तदानाचा ११ वा दिवस*

कोरोनाच्‍या संकटामध्‍ये रक्‍तदानाची प्रक्रिया मंदावली आहे. या काळात रक्‍तदान करावे किंवा नाही असे अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. त्‍यामुळे अनेक रक्‍तदात्‍यांनी या विषयाकडे पाठ केली आहे. मुळात कोरोना काळात कोरोनामुक्‍त झाल्‍यावर २८ दिवसानंतर रक्‍तदान करता येते. त्‍याच प्रमाणे लसिकरण केल्‍यानंतर १४ दिवसाने रक्‍तदान करून एखाद्याचा जीव वाचविता येवु शकतो. युवकच नाहीतर युवतींनीही या सेवायज्ञात योगदान दिले पाहीजे. युवतींनो रक्‍तदानासाठी पुढे या असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. त्‍या आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे आय.एम.ए. सभागृह येथे आयोजित स्‍वेच्‍छा रक्‍तदान शिबिराच्‍या ११व्‍या दिवशी शुक्रवार (११ जुन ) ला कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्ष स्‍थानाहुन बोलत होत्‍या. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणून भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, नगरसेविका छबुताई वैरागडे, शितल आत्राम, रामकुमार आकापेल्‍लीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी पोलिस नायक परविन दिलावर खान पठाण, राखीताई कंचर्लावार, जयश्री आत्राम, शितल आत्राम यांनी रक्‍तदान केले. सर्व रक्‍तदात्‍यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या वतीने फेसशिल्‍ड व सन्‍मानपत्र मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आले. तर रक्‍तदानास प्रोत्‍साहन देणा-या कंचर्लावार व छबुताई वैरागडे यांना आ. मुनगंटीवार यांच्‍या वतीने अभिनंदन पत्र देण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रा‍स्‍ताविक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले. प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी संचालन करून आभार मांडले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *