राजुरा येथे महिला काँग्रेसची आढावा बैठक संपन्न.

By : mohan bharti

राजुरा  :– आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा तालुका महिला काँगेस कमिटी द्वारा महिला काँग्रेसच्या *जिल्हाध्यक्षा श्रीमती चित्रताई किशोर डांगे* यांच्या अध्यक्षतेत महिला काँग्रेसची तालुका स्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी नगराध्यक्ष अरुण धोटे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्राताई डांगे यांनी महिला शक्ती व सक्षमीकरण संदर्भ आपले विचार मांडले, काँग्रेस पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी आणि गावागावात काँग्रेस ला मजबूत करण्यासाठी परिश्रम घेण्यासाठी महिलाशक्तींनी अधिक आक्रमक व सक्रिय होण्याची आवश्यकता समजावून सांगितले. महीला काँगेस कमिटी कडून केके कापून नगराध्यक्ष अरुण धोटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी सभापती मुमताज जावेद अब्दुल, जि. प. सदस्य मेघा नलगे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता उपरे, उपाध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, माजी सभापती निर्मला कुळमेथे, माजी सभापती तथा प स सदस्या कुंदा जेणेकर, नगरसेविका साधना भाके, दीपा करमाकर, सेवादल अध्यक्षा सुमित्रा कुचकर, योगिता मटाले, नंदा गेडाम, अर्चना देवाडकर, रसिका पेंदोर, प्रणाली ताकसाडे, संगीता मोहुर्ले, शुभांगी खामनकर, तानेबाई पंधरे, आशा काकडे, शालू लांडे, संगीता धोटे, उषा मडावी, मनीषा देवाडकर, रेणुका येरमे यासह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता उपरे यांनी केले. संचालन पुनम गिरसावळे यांनी तर आभार प्रदर्शन प स सदस्या कुंदा जेणेकर यांनी केले. कार्यक्रमाला महिला काँग्रेस कमिटीच्या बहुसंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थिती होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here