*पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ*

By : mohan bharti
*गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स च्या मागणीला यश*🌹🌹 🌹🌹🌹
गडचिरोली-गोंडवाना विद्यापीठाद्वारे यावर्षीची सत्र 21-22 मधील पदवी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि ग्रामीण भागात अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांना ही प्रक्रिया कठीण जात असून अतिदुर्गम भागात महाविद्यालय असल्याने मोबाईलचे नेटवर्क प्राप्त होण्यास अती विलंब लागत असल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार होते. विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी विध्यापिठाने निहीत केलेला सदर प्रवेश कालावधी अपुरा पडत होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स अससोसिएशन ने पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी संघटनेने दिनांक 27 सप्टेंबर 2021 च्या निवेदनात प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. या मागणीची दखल घेऊन गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने पूर्वी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत असलेले प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून 16 ऑक्टोंबर 2021 पर्यंत केलेलीआहे यामुळे दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालय प्रशासनात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनिल चिताडे यांची भेट घेऊन चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालया तील प्रवेश परीक्षेतील अडचणी समजावून सांगितल्या या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा झाली होती. प्रवेश प्रक्रिये करीता सदर मुदतवाढ दिल्यामुळे संघटनेने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे. यावेळी शिष्टमंडळात मध्ये गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन चे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय गोरे ,सचिव प्रा.डॉ. विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने, डॉ. किशोर कुडे, डॉ. अभय लाकडे व प्रा. प्रफुल शेंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *