राज्यातील दारूचे दुकान थाटात सुरू करणाऱ्यां महाविकास आघाडी सरकार ने हिंदु मंदिराचे दरवाजेही उघडावेत भारतीय जनता पार्टी, गडचिरोली

By : Shivaji Selokar

राज्यात दारूचे दुकान मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आली परंतु कोट्यावधीं भक्त-भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर मात्र अजून पर्यंत बंद करून ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्य सरकार विरोधात भाजपा,गडचिरोली च्या वतीने गडचिरोली बाजार चौकातील हनुमान मंदिर समोर कोव्हिड-19 च्या नियमाचे पालन करीत शंखनाद आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या माध्यमातून तातडीने मंदिर सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी गडचिरोली येथील शंखनाद आंदोलनाच्या प्रसंगी केले
गडचिरोली येथील आजच्या शंखनाद आंदोलनात प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस,भाजपा STM,महाराष्ट्र प्रदेश. भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे , न.प.उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, ज्येष्ठ नेते रमेश जी भूरसे, सुधाकरभाऊ येनगंधलवार, शहर महामंत्री केशवजी निंबोड, विनोद देवोजवार ,नगरसेविका सौ अलकाताई पोहनकर ,वैष्णवी नैताम,गडचिरोली तालुका संपर्कप्रमुख विलासजी भांडेकर,महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. कविताताई उरकुडे, तालुका अध्यक्षा सौ. दुर्गाताई काटवे , अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री जनार्धनजी साखरे ,राजू शेरकी, विलास जी नैताम,दिनेशआकरे, सोमेश्वर धकाते, राकेश राचमलवार, यांचे सह परिसरातील धार्मिक संघटनांचे पदाधिकारी,पुजारी,फुल-हार,नारळ,अगरबत्ती विक्रेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
देशामध्ये सर्वत्र मंदिर देवदर्शन सुरू करण्यात आलेली आहेत. केवळ महाराष्ट्र राज्यात सना सुदिच्या काळातहि मंदिरे का बंद ठेवण्यात आली असा प्रश्न पुजारी, तथा फुल,नारळ,अगरबत्ती,विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *