गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाचे वतीने निदर्शने

By : Mohan Bharti

गडचांदूर : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाचे वतीने पुकारलेल्या भारत बंद ला समर्थन देण्यासाठी गडचांदूर येथे काँग्रेस पक्षाचे वतीने राजीव गांधी चौकात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे,नगराध्यक्षा सविता टेकाम,जेष्ठ नेते हंसराज चौधरी, नगरसेवक पापय्या पोन्नमवार,राहुल उमरे,जयश्री ताकसांडे,अर्चना वांढरे, शहर अध्यक्ष संतोष महाडोळे,माजी अध्यक्ष रोहित शिंगाडे,रुपेश चुदरी,प्रितम सातपुते, राहुल थेरे,विलास मडावी,प्रणय टेकाम, मकसुद अली,आशिष वांढरे,तथा इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here