गडचांदूर येथून प्रवाशी रेल्वे सुरु करा,,

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदूर,, अदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करा


दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधककडे शिष्टमंडळाने केली मागणी.

गडचांदूर : दक्षिण मध्य रेल्वे चे महाप्रबंधक गजानन मालिया ,दक्षिण रेल्वे, सिकंदराबाद चे महाप्रबंधक, तसेच विभागीय व्यवस्थापक यांनी नुकतीच गडचांदूर रेल्वे स्टेशन ला भेट दिली, माणिकगड,अंबुजा, अल्ट्रा टेक,दालमिया सिमेंटच्या वरिष्ठ अधिकारी सोबत बैठक घेऊन प्रस्तावित गडचांदूर आदीलाबाद रेल्वे मार्ग संबंधित व इतर मुद्दयावर सविस्तर चर्चा केली,
गडचांदूर येथून बल्लारपूर पावेतो प्रवाशी रेल्वे सुरु करावी,बल्लारपूर येथून सुटणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गडचांदूर येथून सोडावी,गडचांदूर, आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करुन पूर्ण करावे अशा मागण्या गडचांदूर येथील शिष्टमंडळाने रेल्वे च्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले,सविस्तर चर्चा केली, गडचांदूर शहर व परिसरात सिमेंट उद्योग व कोळशाच्या खाणी असल्याने महाराष्ट्र व इतर प्रांतातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव करीत आहे, त्यांना स्वगृही जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सोईस्कर आहेत, तसेच सर्व उद्योगांना वाहतूक करिता सोईस्कर आहेत,
गडचांदूर, आदीलाबाद मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 2010,11 मध्येच आर्थिक तरतूद करण्यात आली आहेत मात्र रेल्वे च्या ढिसाळ कारभारामुळे आजपावेतो या रेल्वे मार्गा चे काम सुरू झाले नाहीत. दक्षिण रेल्वे च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे त्यामुळे कामाला गती येईल अशी अपेक्षा आहे.  शिष्टमंडळामध्ये रमेश काकडे,रोहन काकडे,दीपक वरभे व इतरांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here