Home
Home चंद्रपूर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून पत्रकार शंकर तडस सन्मानित

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून पत्रकार शंकर तडस सन्मानित

By : Devanand Sakharkar

चंद्रपूर :

ग्रामीण पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘सकारात्मक लोकजागर’ करीत असलेले ‘लोकदर्शन’ पोर्टलचे संपादक शंकर तडस यांना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ,सावित्रीबाई फुले, फातिमा शेख ,राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तिक जयंती निमित्त १२जानेवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार -संवाद हा कार्यक्रम ‘श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम ,वडगाव चंद्रपूर येथे घेण्यात आला. ‘काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने ‘सफरनामा सामाजिक पत्रकारितेचा वेचक आणि वेधक अनुभव ‘ या विषयावर मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून झी न्यूज २४तास मराठी मीडिया समूहाचे चंद्रपूर गडचिरोलीचे विभागाचे वरिष्ठ पत्रकार आशिष अंबाडे,  वन व हवामान मंत्रालय, दिल्ली माजी सदस्य तथा अध्यक्ष ग्रीन प्लानेट सोसायटी ,पर्यावरण संस्था चंद्रपूर पर्यावरणवादी अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख जनमंच सदस्य रवींद्र तीराणिक तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य मार्गदर्शक म्हणून राम आखरे भारतीय सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष, जनमंच सदस्य होते. श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम चे अध्यक्ष डॉ. शंकर झोडे (एमडी ), सेवाश्रमचे सचिव अरुण बावणे, पत्रकार संघाच्या चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा जनसंपर्कप्रमुख प्रा. डॉ. मंजुषा सागर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर पतिवार यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र, शाल, श्रीफळ तसेच स्वामी विवेकानंद यांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी, प्रसार व वाहिनी माध्यम प्रतिनिधी त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here