अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे दीक्षांत बेले सन्मानित

By : Priyanka Punvatkar

चंद्रपूर :

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दीक्षांत बेले यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, वडगाव चंद्रपूर येथे पत्रकार संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ,सावित्रीबाई फुले, फातिमा शेख ,राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तिक जयंती निमित्त १२जानेवारी २०२४ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार -संवाद हा कार्यक्रम श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम ,वडगाव चंद्रपूर येथे ‘काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने ‘सफरनामा सामाजिक पत्रकारितेचा वेचक आणि वेधक अनुभव या विषयावर पत्रकार संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून झी न्यूज २४तास मराठी मीडिया समूहाचे चंद्रपूर गडचिरोलीचे विभागाचे वरिष्ठ पत्रकार आशिष अंबाडे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून पर्यावरण वन व हवामान मंत्रालय, दिल्ली माजी सदस्य तथा अध्यक्ष ग्रीन प्लानेट सोसायटी ,पर्यावरण संस्था चंद्रपूर पर्यावरणवादी अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख जनमंच सदस्य रवींद्र तीराणिक तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य मार्गदर्शक म्हणून राम आखरे भारतीय सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष, जनमंच सदस्य, श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम चे अध्यक्ष डॉ. शंकर झोडे (एमडी )होमिओपॅथी कॉलेज खामगाव ,सेवाश्रम चे सचिव अरुण बावणे, पत्रकार संघाच्या चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा जनसंपर्कप्रमुख प्रा .डॉ.मंजुषा सागर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर पतिवार, व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वृत्तछायाचित्रकार देवानंद साखरकर यांची प्रामुख्याने उपस्थित होती. सदर कार्यक्रमात मान्यवर वक्ते व मार्गदर्शकाच्या उपस्थितीत दीक्षांत बेले यांना स्वामी विवेकानंद यांची पुस्तके, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *