अखिल भारतीय ग्रामीण प्रपत्रकार संघ वरोरा शाखा अध्यक्षपदी प्रवीण गंधारे यांची निवड 

By : Dharmendra Sherkure

वरोरा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून वरोरा शाखेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. वरोरा येथील डॉ. एपिजे अब्दुल कलाम, रत्नमाला चौकातील रूचिदा हाॅटेल मध्ये रविवारी दुपारी १ वाजता पञकार संघाची सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख श्री रविंद्र तिराणीक होते. मार्गदर्शक म्हणून प्रदिप कोहपरे जिल्हा सचिव, प्रमुख सल्लागार म्हणून विनोद शर्मा जिल्हा उपाध्यक्ष दै ,लोकमत समाचार यांची सभेला उपस्थिती होती. श्री रविंद्र तिराणीक यांनी सभेला संघटना वाढीसाठी व पञकार कसा असावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.  पञकार संघांचे जिल्हा सचिव प्रदीप कोहपरे (दैनिक भास्कर)यांनी सभेचा लेखाजोखा सभाध्यक्षा समोर मांडला व नविन कार्यकारिणी घोषित केली.  पञकार संघाचे सदस्य परमानंद तिराणीक यांना महाराष्ट्र शासनाचा जिवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल त्यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागील पञकार संघाच्या अध्यक्षांनी संघटना वाढीसाठी कोणत्याही प्रकारची कामे केली नाही.  गेल्या वर्षभरात पञकारांना विश्वासात घेतले नाही, किंबहुना संघाची मासिक सभा बैठका बोलावली नसल्याने सादिक थैम अध्यक्ष असलेल्या पञकार संघाच्या कामगिरीवर ठपका ठेऊन महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख रविंद्र तिराणीक यांनी नाराजी व्यक्त करून जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव सर्वानुमते पारित केला व नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तालुका अध्यक्षपदी प्रवीण गंधारे दै नवभारत,व सचिव पदी धर्मेंद्र शेरकुरे विदर्भ वतन यांची नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्षपदी ग्यानिवंत गेडाम दैनिक सह्यांद्रीचा राखणदार, सहसचिव मनोज गाठले दै पुण्यनगरी, परमानंद तिराणीक ट्राईबल पोस्ट, संपर्क प्रमुख, तुलसीदास आलाम गोंडवाना न्युज पोर्टल प्रसिद्धी प्रमुख, मार्गदर्शक सल्लागार पदी जगदीश पेंदाम दै नवभारत , संघटक पदी खेमचंद नेरकर दै चंद्रधुन , प्रशांत बदकी लोकहित महाराष्ट्र न्यूज पोर्टल कोषाध्यक्ष,तर मुख्य मार्गदर्शक म्हणून राजेंद्र मर्दाने दैनिक युवा राष्ट्रदर्शन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली , नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे वरिष्ठांनी पुष्प गुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *