आदरणीय सौ. रश्मीवहिनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन*

 

लोकदर्शन मुंबई प्रतिनीधी:÷ महेश कदम

गणेशोत्सवाचे औचित्य साधून युवासेना सहसचिव व चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत प्रतिवर्षीप्रमाणे विभागातील गणेशभक्तांकरीता आरतीसंग्रहाचे वाटप करण्यात येणार आहे. या आरती संग्रहाचे प्रकाशन सामना वृत्तपात्राच्या संपादिका सौ. रश्मी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्थानिक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष विभागप्रमुख महेश सावंत, महिला विभाग संघटिका श्रद्धा जाधव, वडाळा विधानसभा विभाग संघटक राकेश देशमुख उपविभाग प्रमुख रवी घोले, शाखा प्रमुख हमीद शेख, रवी गुप्ता यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here