Home
Home Breaking News वाल्मिकेश्र्वर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा

वाल्मिकेश्र्वर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा


लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी
वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस साजराकरण्यात आला. येथील वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात थोर गणितीय श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांनी करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणित तज्ञ डि.आर.नाईकनवरे, बि.व्हि.बुधवंत, एम.एस.गिरी, आर.बि.राठोड, एस.ए.महाडिक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विध्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी गणित तज्ञ डि.आर.नाईकनवरे, एम. एस.गिरी, आर.बि.राठोड ,बि.व्हि.बुधवंत, एस.ए.महाडिक यांनी मानवी जिवणातील गणिताचे महत्त्व भाषणातुन विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जि.एम.कावळे यांनी केले तर आभार व्हि.एन.बोंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठि लिपिक उमाकांत क्षीरसागर, बळीराम शेंबडे यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here