Home
Home Breaking News गोंडवाना विद्यापीठाच्या अमृत क्रीडा व कला महोत्सवात शिक्षकांना सहभागी करा* *गोंडवांना...

गोंडवाना विद्यापीठाच्या अमृत क्रीडा व कला महोत्सवात शिक्षकांना सहभागी करा* *गोंडवांना विध्यापिठ यंग टीचर्स ची कुलगुरू कडे मागणी*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने दिनांक 27ते 29 जानेवारी2023 या कालावधीमध्ये अमृत क्रीडा व कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.मात्र या महोत्सवामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सहभाग नसल्याने गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स अससोसिएशनने कुलगुरू कडे शिक्षकांचा सदर महोत्सवात सहभाग करण्यासंबंधी एका पत्रकान्वये मागणी केली आहे.
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यामध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण व्हावा या उदात्त हेतूने गोंडवाना विद्यापीठाने अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे या संबंधात केवळ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता गो.वि.ग.511/2022 दि.9-12-2022 अन्वये विद्यापीठाने सहभागाबाबतचे पत्र निर्गमित केले मात्र या महोत्सवांमध्ये विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकांचा सहभाग नसल्याने संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून अनेक गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अनेक महाविद्यालयातील शिक्षकांनी गोंडवांना यंग टीचर्स संघटनेकडे सदर महोत्सवात शिक्षकांचा सहभाग असावा याबाबत निवेदन दिले असून या पार्श्वभूमीवर गोंडवाना यंग टीचर असोसिएशनने एका पत्रकाद्वारे सदर अमृत क्रीडा व कला महोत्सवात शिक्षकांचाही सहभाग करावा अशी मागणी केली आहे.
अमृत क्रीडा व कला महोत्सव करिता क्रिकेट, व्हॉलीबॉल, दौड स्पर्धा खो खो,रस्साखेच,कबड्डी व संगीत खुर्ची या क्रीडा प्रकारात सहभागी होण्याचे आवाहन केले असून कला प्रकारांमध्ये समूहव एकल गीत गायन तसेच समूह वएकच नृत्य तथा लघुनाटिका या प्रकाराचा समावेश केलेला आहे मात्र या क्रीडा महोत्सवामध्ये शिक्षकांच्या सहभागाबाबत कुठलाही उल्लेख नाही व याबाबत विद्यापीठाचे कुठलेही पत्र नसल्यामुळे गोंडवांना यंग टीचर चे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोरलावार यांनी एका पत्रका द्वारे सदर महोत्सवांमध्ये शिक्षकांचा सहभाग करावा अशी मागणी कुलगुरूकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here