युवक काँग्रेसच्या वतीने सोनियाजी गांधींचा वाढदिवस उत्साहात : शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वितरण

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा तथा खासदार श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपना येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्नाखाली कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वितरण करण्यात आले. या उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी खैरगाव चे सरपंच तथा युवक काँग्रेसचे तालुका सचिव रोशन मरापे, मुख्याध्यापक वरखडे सर, मडावी सर, जाधव सर, परचाके सर, हंसराज मरापे, विठ्ठल गेडाम, मंदा मडावी, पवन गुरनुले, धनराज गेडाम, श्रीधर मडावी, हरिदास गेडाम यासह शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी गण, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here