लोकदर्शनअमरावती 👉राजू कलाने
अमरावती जिल्ह्यातील येणारे गाव अस्थी भूमी नया अकोला येथे 6 डिसेंबर पिरखा जी कमिटी अमरावती, माजी आमदार सुनील देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, स्थानिक माजी जी. प.सदस्य प्रकाश साबळे, ऍड दिलीप एडतकर, प्रवक्ता काँग्रेस पक्ष आणि अस्थी स्वतः त्यांनी घेऊन पीरखा जी खोब्रागडे यांना दिल्या असा खोटा इतिहास सांगणारे रामजी छापाणी व व्यासपीठावर उपस्थित सर्व काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांच्या बद्दल तक्रार असून त्यांनी जाहीर माफी मागावी.अन्यथा महाराष्ट्रातील संपूर्ण आंबेडकरी जनता व संघटना ,पक्ष यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी व पदाधिकारी यांना कायदेशीर माफी करिता धडा शिकवू.अशी माहिती दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी स्थानिक श्रमिक पत्रकार भवन राजापेठ येथील पत्रकार परिषदेत श्रीमती शांताबाई पिरखाजी खोब्रागडे व त्यांचे सुपुत्र गौतम पिरखाजी खोब्रागडे यांनी दिली. त्यावेळी या पत्रकार परिषदेत शोभाबाई मोटघरे, जयमलाबई मेश्राम, साधनाबई मेश्राम, मीनाक्षी वासनिक, मंदाबई रामटेके, प्रतिभाबई पानतावणे, इंदिराबई गोसावी, शांताबाई सहरे,भागर्तबई राऊत, सुशिलाबई राऊत, रेखाबई इंगळे, लालिताबई गजभिये, नगांबई पानतावणे, सरिकाबई रामटेके, शालुबई वासनिक, सत्यभामा गजभिये,लताबाई मेश्राम, पंचफुला खोब्रागडे, किरांबई बांबोले, विद्याबई खोब्रागडे, किसनजी वासनिक, भाऊरावजी बागडे, आजाबराव मोहोड, मोहनदासजी मेश्राम, प्रदीपराव गजभिये, विकास पानेकर हे गावकरी अस्थी भूमी नया अकोला येथील अस्थींचे सेवा करणाऱ्या सर्व बौद्ध उपासक उपसिका वृद्ध महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.