टाटाकोहाड येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

जिवती :– जिवती तालुक्यातील ग्रामपंचायत खडकी हिरापूर अंतर्गत येणाऱ्या मौजा टाटाकोहाड येथील भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी जि प सदस्य भिमराव पा. मडावी यांच्या घरी आयोजित कार्यकर्ता बैठकीत आ. धोटे यांनी काँग्रेस पक्षांचे दुप्पटे देवून सर्वांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आणि स्वागत केले.
यात दत्ता मरके, प्रदीप परतले, भक्तराज म्याकले, शंकर कासले, किसन पवार, लक्ष्मण मरके, गणपत कासले, विठ्ठल पवार, अशोक पवार, रविदास परतले, गंगाधर जाधव, रामू पवार, अंकुश मरके, अशोक आत्राम, अनुरथ बंडे, साईनाथ चंदे, विजय परतुले, परमेश्वर बावणे, नारायण नामपल्ले, व्यंकटी गाजीले यासह अनेकांचा समावेश आहे.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्य भीमराव पाटील मडावी, गोपाल कासले, सरपंच सौ. नैना शिंदे, उपसरपंच निर्मला मंदेवाड, सरपंच सिताराम मडावी, भीमराव पवार, अशफाक शेख, महादेव डोईफोडे, कल्लीम शेख, पांडू पवार, संदीप शिंदे, विठ्ठल आक्रते, आनंदराव जाधव, वजीर शेख, अब्बस अली शेख, शिवाजी श्रीरामे, काशिनाथ कांबळे, शंकर गेडाम, रफिक पठण, अकबर शेख, नायकु सिडाम यासह जिवती काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here