श्री साई सेवा मंडळ उरण विभागातर्फे उरण ते शिर्डी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि ६ नोव्हेंबर २०२२ उरण तालुक्यातील श्री साईबाबांची मानाची पहिली पालखी श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे काढण्यात आली. मानाची पहिली पालखी म्हणून श्री साई सेवा मंडळाची दिंडी सुपरिचित आहे.सालाबादप्रमाणे या वर्षीही श्री साई सेवा मंडळ उरण विभाग यांच्यावतीने श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त श्री साईबाबांच्या भव्य पालखी, वारकरी दिंडी पदयात्रा श्री दत्तमंदीर देऊळवाडी-उरण येथून सोमवार, दि.२८/११/२०२२ रोजी सकाळी ६.३० वा. श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डी येथे प्रस्थान होणार असून श्रींची पालखी मंगळवार, दि. ०६/१२/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. श्री क्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहोचेल.सोमवार दि. २८/११/२०२२ रोजी सकाळी ६ ते ६:३० वा. श्रींची पालखी व पादुका साईभक्त भाविकांच्या दर्शनासाठी देऊळवाडीतील श्री दत्तमंदीरामध्ये ठेवण्यात येणार आहेत. तरी साईभक्त भाविकांनी श्रींच्या पालखीचा व पादुकांच्या दर्शनाचा आवश्य लाभ घ्यावा.तसेच बाबांच्या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सामील न होणाऱ्या साईभक्त भाविकांनी पालखी दिंडी सोबत पाच पाऊले चालण्यासाठी व पायी चालत जात असलेल्या पदयात्री साईभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी हजर राहून श्री साईंचा कृपा आशिर्वाद घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

पहाटे ५ वा. आरती, पूजन व भजन,५:१५ वा. ॐ श्री साईनाथाय नम: या मंत्राचा जप व पुढे मार्गस्य प्रस्थान, दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती,दुपारी १२:३० श्री साई सच्चरित्राचे, सामुदायिक साप्ताहिक पारायण तसेच साईस्तवन मंजुरी वाचन, दुपारी ३:३० वा पुढील मुक्कामाकडे प्रस्थान,ॐ श्री साईनाथाय नमः मंत्रांचा जप, सायंकाळी ६.१५ धुपारती असे दैनंदिन कार्यक्रम असून पालखी दिंडीच्या सांगता प्रित्यर्थ श्री साई भंडारा व श्री सत्यनारायणाची महापूजा शनिवार, दि. १७/१२/२०२२ रोजी श्री रत्नेश्वरी मंदीर, मु. जसखार येथे संपन्न होणार आहे.

दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी
अध्यक्ष संदीप पाटील -9920548181,
उपाध्यक्ष अजित पाटील -9322888505,
कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील -8879614920,
उपाध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे -7039104237,
सेक्रेटरी सुनिल पाटील – 9664165877
यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here