महात्मा गांधी विद्यालयात संत गाडगेबाबा व संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे संत गाडगेबाबा व संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम च्या
अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमूख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय पाटील गोरे,उपप्राचार्य विजय आकनुरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षिका सौ शोभा जीवतोडे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम संत गाडगेबाबा आणि संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी प्रा सुधीर थिपे यांनी संत गाडगेबाबा व संत रविदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रा माधुरी पेटकर यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here