Home
Home गडचांदूर / कोरपणा सवीत्रीबाई फुले विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर च्या वतीने संत गाडगेबाबा यांची...

सवीत्रीबाई फुले विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर च्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदुर ,÷ सवीत्रीबाई फुले विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर च्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धर्मराज काळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. जहीर कला विभाग प्रमुख ,प्रा. वांढरे एम.सी.व्ही.सी.विभाग प्रमुख,प्रा. कु. ताकसांडे मॅडम विज्ञान विभाग प्रमुख, तसेच प्रा. झाडे ,प्रा. सुरपाम, प्रा. सातारकर,प्रा.खान, प्रा.मुप्पीडवार, प्रा.पोडे,प्रा.गुजर,प्रा. डफाडे,आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या फोटोला हार अर्पण करून पूजा करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य धर्मराज काळे यांनी गाडगेबाबांच्या कार्यांचा धावता आढावा व त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे केलेले कार्य यांची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. प्रा. प्रशांत खैरे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले संचालन केले. तर प्राध्यापक सुरपाम यांनी उपस्थितांचे आभार मानले .यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीउपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here