आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गाडगे महाराज जयंती साजरी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच संत गाडगेबाबांचे ध्येय- सौ. किरणताई बोढे*

येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात श्रीसंत योगी गजानन महाराज प्रगट दिन व थोर संत, समाज सुधारक गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत गजानन महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन हेच संत गाडगेबाबा यांचे ध्येय होते त्यांच्या एका हातात झाडू दुसऱ्या हातात मडक असायचे ते जिथे जात असत तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम करायचे त्यांनी समाजाला शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.
यावेळी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, पियुष भोंगळे, आचल कांबळे, जया हस्ते, सविता ठाकरे, संगीता जेऊरकर, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, भारती परते, स्वाती गंगाधरे, उमेश दडमल, दुर्गा साहू, लता आवारी, स्नेहा कुम्मरवार उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *